ओटावा
ओटावा : कॅनडाची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ३,०२,३४१ (१९७१). हे आँटॅरिओ प्रांताच्या कार्लटन परगण्यात, ओटावा नदीच्या दक्षिण काठावर, माँट्रिऑलच्या पश्चिमेस १६० किमी. व टोराँटोच्या ईशान्येस ३९७ किमी. आहे. गॅटीनो, ओटावा व रिडो ह्या नद्यांच्या संगमाजवळ १० ते ६० मी. उंचीच्या टेकड्यांवर ओटावा विस्तारलेले असल्याने भोवतालच्या हिव्यागार दऱ्याखोऱ्यांचे सौंदर्य येथून पहावयास मिळते.